जिल्हा परिषद अध्यक्षाचे पती लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना धमकावतात.

जिल्हा परिषद कारभार चालवतो कोण ?मनसेच्या उपरकर यांचा गंभीर आरोप

*💫कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार नक्की लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी चालवतात का? असा प्रश्न मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थितीत केला आहे. जिल्हा परिषदेच्या कारभारात लोकप्रतिनिधींचे पती हस्तक्षेप करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. अशा घटना घडत असताना कर्मचारी व अधिकारी संघटना तसेच विरोधी पक्ष गप्प का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी नियमांत नसणारी कामे अधिकाऱ्यांवर दबाव टाकून करण्यास भाग पाडत आहेत. यावेळी काही वेळा यात सहीचे अधिकार अधिकाऱ्यांना असल्याने तेच अडचणीत सापडतात तर हे लोकप्रतिनिधी बाजूला राहतात असे देखील ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page