राकेश परब मित्रमंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत कशेडीचा दुनियादारी ग्रूप प्रथम…

⚡मालवण ता.२१-:
मालवण तालुक्यातील चुनवरे येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश परब आणि मित्रमंडळाच्या वतीने मालवण तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय खुली तसेच गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्पर्धा संपन्न झाली. मालोंड माळ येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय खुल्या गटात सोबा जुगाई दुनियादारी ग्रुप कशेडी यांचा बैलगाडा विजयी ठरून २५ हजार रुपयांचे पारितोषक पटकावले. तर गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्वयंभू सांबप्रसन्न पाटगाव बैलगाड्याने प्रथम क्रमांक मिळवीत रु. ७ हजारचे पारितोषिक पटकावले.

मालवण तालुक्यात प्रथमच भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत गावठी बैलगाडा स्तरावर १६ बैलगाड्या तर राज्यस्तरीय खुल्या गटात सुमारे ३६ बैलगाड्यानी सहभाग घेतला. बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालोंड बेलाचीवाडी सरपंच पूर्वा फणसगावकर, उपसरपंच लक्ष्मण उर्फ आपा चव्हाण, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, जॉन नऱ्होना, पोईप सरपंच श्रीधर नाईक, वेरळ सरपंच धनंजय परब, महेश बागवे, उद्योजक सुरेश नेरुरकर प्रितम गावडे, अनंत भोगले, बाबुराव चिरमुले, छोटू ठाकूर, जितेंद्र परब, गोपीनाथ पालव, विलास पांजरी, दत्ताराम आंबेरकर, पंकज परब, कणकवली नगरसेवक बाळा सावंत, भाजपा अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नायब तहसीलदार नागेश शिंदे, मसदे ग्रा. प. सदस्य गणेश नेरुरकर, अरुण मेस्त्री, दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार वेर्लेकर, डॉ. करंबेळकर, वेदिका नार्वेकर, व राकेश परब मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत राज्यस्तरीय खुल्या गटात सोबा जुगाई दुनियादारी ग्रुप कशेडी यांच्या बैलगाडाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक पांडुरंग पाटील केरली यांच्या बैलगाडा (२० हजार रु.), तृतीय क्रमांक अभिजीत रमेश गुरव (रु.१५ हजार) चतुर्थ क्रमांक बबन झोरे (रु. १० हजार), पाचवा क्रमांक सिद्धेश्वर लक्ष्मण परब कासरल (रु. ७ हजार), सहावा क्रमांक रमेश काशीराम पावसकर रु. ५ हजार) सातवा क्रमांक मिलिंद केळकर कुसबे तालुका कुडाळ (रु.३ हजार) अशी पारितोषिके देण्यात आली.

गावठी बैलगाडा विभाग स्तरावर प्रथम क्रमांक स्वयंभू सांबप्रसन्न पाटगाव (रु. ७ हजार), द्वितीय क्रमांक दत्त साई कन्स्ट्रक्शन लांजा (रु. ५ हजार), तृतीय क्रमांक शैलेंद्र गणपत कदम मुरडाव (रु. ३ हजार). चतुर्थ क्रमांक शैलेंद्र गणपत कदम मुरडाव रु. २ हजार) यांनी मिळविला. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम बरोबरच राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक ढाली देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन रणजीत पाटील कोल्हापूर यांनी केले, तर सूत्रसंचालन आशिष ठाकूर तर टाईम कीपर म्हणून निळकंठ मेस्त्री कणकवली यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page