परीट समाजाचा ४ मे रोजी कुडाळमध्ये कोकण विभागीय मेळावा…

वधुवर सूचक मेळाव्याचेही आयोजन:जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांची पत्रकार परिषद..

⚡कुडाळ ता.२०-: श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये तिसऱ्या कोकण विभागीय स्नेह मेळाव्याचे आणि पहिल्या वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा आणि बेळगाव येथून या मेळाव्यासाठी परीट समाजातील बांधव उपस्थित राहणार आहेत. परीट बांधवांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे तसेच इच्छुक वधू-वरांनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन परीट समाजसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर आणि प्रदेश सदस्य प्रदीप नारकर यांनी केले आहे. ते आज कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुडाळच्या हॉटेल लाईम लाईट येथे श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन या मेळाव्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रदीप नारकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपाली भालेकर, उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, जिल्हा सचिव अनिल शिवडावकर,मालवण तालुकाध्यक्ष मोहन वालकर, कुडाळ तालुकाध्यक्ष सदानंद अणावकर,कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र करंजेकर,देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सदस्य संदीप कडू, गुरुनाथ मडवळ,संदीप बांदेकर, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ, महिला कुडाळ तालुकाध्यक्षा अक्षता कुडाळकर, जिल्हा सदस्य अशोक पोखरणकर, सह खजिनदार अशोक आरोलकर, सविता कुडाळकर, धनश्री चव्हाण, युवा प्रदेश सदस्य गितेश कडू, गणेश कुणकेश्वर, तातू कडू आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप भालेकर म्हणाले, संत गाडगेबाबा परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजीत कोकण विभागीय स्नेह मेळावा व वधुवर मेळावा रविवार दि. ४ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायं ६.०० राजेपर्यंत श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा व बेळगाव या जिल्ल्यातून परीट समाज बांधव बहुसंख्येने उपस्थितीत राहणार आहेत. या मेळाव्यास महाराष्ट्रातील या समाजातील वरिष्ठ नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा स्नेह मेळावा होणार आहे. या मेळाव्याला अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परीट (धोबी) महासंघाचे अध्यक्ष खंडेराव कडलक, प्रदेश महिला अध्यक्ष सौ सीमाताई रंधे, प्रदेश महिला कार्याध्यक्ष सुषमाताई अमृतकर, माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राजेंद्रशेठ खैरनार, महाराष्ट्र परिषद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संतोषभाऊ भालेकर, समाज मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई कदम, कोकण विभागीय मंडळ अध्यक्ष नंदकुमार राक्षे, कार्याध्यक्ष अनिल सुर्वे, मराठा मडवळ हितवर्धक समाज मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण गावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्नेहमेळावा व वधुवर पुचक मेळावा एकाच दिवशी होत असल्याने कोकण विभागात तसेच सिंधुदुर्गात या समाजामध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तळागाळातील सर्व समाजाला एकत्र करून त्यांना रोजगाराच्या संधी देणे, तरुणांना व्यवसाय, मोकरीत स्थान देणे, महिन आर्थिक सक्षमीकरण करणे, श्री संत गाडगेबाबा समाज धर्मशाळा बांधणे, परीट समाज आर्थिक विकासमंडळाची स्थापना करणे, मुला-मुलींना शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान करणे, तसेच उच्चशिक्षित करणे, गरीब परीट समाजातील कुटुंबांना आर्थिक मदत करणे याबरोबरच रक्तदान शिबिर, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्याथ्यार्थ्यांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, असे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम भविष्यात राबविण्यात येणार आहेत.
सकाळच्या सत्रात स्नेह मेळावा आणि दुपारच्या सत्रात परीट समाज वधुवर सूचक मेळावायचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. विवाहेच्छूक मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा खूप जास्त आहे. या वधुवर सूचक मेळाव्याच्या द्वारे हा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे दिलीप भालेकर यांनी सांगितले. वाढवणे सूचक मेळाव्यासाठी आपल्या बायोडेटासह अविनाश परीट (९४२०३५६३२६), सदानंद अणावकर (९४२१४२४२८३) किंवा लीलाधर अणावकर (९४२०६३९०००) यांच्याशी नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रदीप नारकर यांनी या मेळाव्या मागची भूमिका अधिक विस्तृतपणे विशद केली.

You cannot copy content of this page