मालवण दि प्रतिनिधी-: मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी काम करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांला इंडियन कोब्रा जातीचा साप दृष्टीसपथास पडल्यानंतर त्या सापास सर्पमित्राच्या साहाय्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे मालवण तालुक्यातील मसुरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेश द्वाराच्या आतमध्ये इन्व्हर्टरची बॅटरी ठेवलेल्या टेबलच्या खाली सुमारे साडे तीन फूट लांबीचा सर्प कर्मचाऱ्यांना दृष्टीस पडला. लागलीच याबाबत कोकण वाइल्ड लाइफ रेस्क्यू फर्म सिंधुदुर्ग चे सदस्य मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण पेडणेकर याना कळविण्यात आल्या नंतर रमण यांनी सदर सर्पाला पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले. इंडियन कोब्रा या प्रजातीचा हा सर्प असल्याची माहिती रमण पेडणेकर यांनी दिली असून नागरी वस्तीमध्ये सर्प आढळून आल्यास त्याला न मारता आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रमण पेडणेकर यांनी केले आहे.
मसुरे आरोग्य केंद्रात आढळला इंडियन कोब्रा…!
