*देवगड येथे पोलिसांची दंगा काबू रंगीत तालीम…

*💫देवगड दि.२५-:* हातात दंडूके घेवून जाणाऱ्या पोलिसांना पाहताच मळई नागरिकांनी घेतला धसका मात्र पोलिसांची रंगीत तालीम आहे हे कळल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. देवगड पोलिस स्टेशनचे स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक संचारबंदीच्या पाश्र्वभूमीवर दंगा काबू योजना रंगीत तालीम मळई मस्जिद जवळ रविवारी सकाळी १० वाजता पार पडली.यामध्ये २ अधिकारी, १४ पोलिस अंमलदार व ७ होमगार्ड सहभागी झाले होते. आगामी हनुमानजयंती व रमजान ईद पाश्र्वभूमीवर मळई मस्जिद येथे ही रंगीत तालीम घेण्यात आली अशी माहिती स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांनी दिली.

You cannot copy content of this page