मळेवाड कोंडुरे सरपंचाची युवकांप्रति तत्परता..

रात्रोच्यावेळी दिली गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्यांना ओळखपत्रे;युवकांनी मानले हेमंत मराठे यांचे आभार

*💫सावंतवाडी दि.२५-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी रात्रीच्या वेळी गोव्यात जाणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्र तयार करून दिल्याबद्दल युवकांनी मराठे यांचे आभार मानले. गोव्यात कामानिमीत्त ये जा करण्यासाठी पोलिस चेक पोस्ट वरून गोवा राज्यात सोडण्यासाठी ग्रामपंचायतचे ओळखपत्र बरोबर असणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी आम्हाला गोव्यात जाणाऱ्या व्यक्तींना मिळाली. गोव्यात जाणारे सकाळी लवकर जात असल्याने त्यांना ओळखपत्र आज मिळणे गरजेचे होते.आज रविवार असल्याने ग्रामपंचायत बंद होती.मात्र कामावर जाणाऱ्या व्यक्तिंची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांना बोलवून ओळखपत्रे तयार करून ती तात्काळ दिली. याबद्दल सरपंच मराठे व त्यांच्या टिमला यांना युवकांनी धन्यवाद दिले.काम करण्याची लकब आणि तत्परता आज पुन्हा एकदा मराठे यांनी दाखवून देत ग्रामपंचयती च्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामस्थांच्या कामासाठी उशिरा ग्रामपंचायत कार्यालय उघडली.ही ओळखपत्रे करण्यासाठीं लिपिक सखाराम जाधव व शिपाई सिद्धेश मुरकर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही युवकांनी आभार मानले.

You cannot copy content of this page