⚡सावंतवाडी ता.१०-: न्हावेली चौकेकरवाडी येथील श्री देवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळातर्फे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
दरम्यान, मंडळातर्फे श्री. परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदार नार्वेकर, सत्यवान बांदेकर, शरद धाऊसकर, रमेश निर्गुण व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
