गिर्ये बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन…

मालवण (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील गिर्ये बांदेवाडी येथील श्री हनुमान मंदिरात दि. १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे.

यानिमित्त दि. ११ एप्रिल रोजी रात्री स्थानिक भजने (जागर) होणार आहेत. दि. १२ रोजी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव, पूजन, महाआरती, प्रभातफेरी होणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी २ वाजल्यापासून लहान मुलामुलींसाठी महिलांसाठी विविध स्पर्धा, संध्याकाळी ६ वाजता बक्षिस समारंभ, महाआरती, रात्री १० वाजता गिर्ये पंचक्रोशीतील सुस्वर भजने होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page