⚡सावंतवाडी ता.१०-: खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी येथिल भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कडुन कात्करी समाजाच्या मुलांच्या मु. पो. वेताळ बांबार्डे, कुडाळ, येथिल नाग्या महादू निवासी वसतीगृहाला भेट वस्तु व कपडेभेट दिली.
या प्रसंगी नगरसेवक/सभापती अॅड. परिमल नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर, श्री. आनंद नेवगी, श्री. उदय नाईक, माजी नगरसेवक गुरू मठकर शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, वसतीगृह संचालक श्री. उदय आईर, एन. जी. ओ. श्री. भार्गव शिरोडकर, सौ. शिरोडकर तसेच वसती गृहातील मुले उपस्थित होती.
या पसंगीसर्व मुलांना शैक्षणिक दृष्टया आवश्यक असेल सर्व सहकार्य व वसतीगृहाविषयी शानस पातळीवर मा. श्री. नारायण राणे, मा. पालकमंत्री श्री. नितेश राणे, मा. आमदार श्री. निलेश राणे व मा. आमदार श्री. दिपक केसरकर यांच्या यांच्या माध्यमातून भविष्यात वसतिगृहाच्या हीत व कल्याणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येईल याची ग्वाही उपस्थितांकडुन देण्यात आली
