वेंगुर्ला प्रतिनिधी – श्री देव गौतमेश्वर पंचायतनाच्या कृपाप्रसादाने आणि समस्त भागवतप्रेमी यांच्या सहकार्याने दाभोली येथील श्री नारायण मंदिरात १३ ते २१ एप्रिल या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. कुडाळ येथील वेदमूर्ती सचिन भाटवडेकर हे भागवत कथेचे वाचन तर मूळ संहिता वाचन वेदमूर्ती गणेश जोशी (हरिचरणगिरी) आणि वेदमूर्ती संदीप टेंगसे (गोवा) हे करणार आहेत.
दि.१३ रोजी यजमान प्रायश्चित्तादि विधी, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, आचार्य वरण, प्रासाद शुद्धि, श्रीमद्भागवत पीठ देवता आवाहन, स्थापना पूजन आणि श्रीमद्भागवत महात्म्य वाचन, सकाळी १० ते १२ ग्रंथदिडी, आरती व महाप्रसाद, दि. १४ ते २० एप्रिल सकाळी ७ ते १२ या वेळेत दररोज मूळ संहिता वाचन, आवाहित देवता नैवेद्य समर्पण व आरती, १ ते २ प्रसाद, दि.१३ ते २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ८ पर्यंत कथा निरूपण, आरती व नंतर अल्पोपहार, दि. २० रोजी सकाळी १०.३० वा. श्री भगवद्गीता पठण विष्णू सहस्त्रनाम सामुहिक पठण, आरती, मंत्रपुष्प आणि १२ ते ३ महाप्रसाद, दि. २१ रोजी श्री देव नारायण आदी परिवार देवता मूर्ती पुनःप्रतिष्ठापना वर्धापनदिनानिमित्त श्रीसत्यनारायण महापूजा, लघुरूद्र, आरती व महाप्रसाद, रात्रौ ८ वा. पालखी होणार आहे.
आध्यात्मिक रहस्यातून आपले जीवन समृद्ध बनविण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री भागवत सत्संग सेवा समिती व दाभोली ग्रामस्थ यांनी केले आहे.
