सावंतवाडी : मळगाव ब्राह्मणआळी-पिंपळवाडी येथील श्री जय हनुमान मंदिरात शनिवार १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मळगाव ब्राह्मणआळी-पिंपळवाडी येथील श्री जयहनुमान कला, bक्रीडा व सांस्कृतिक मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ७ वाजता अभिषेक सोहळा, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजन मंडळांची भजने आदी कार्यक्रमांसहीत रात्री ९.३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, यांचा मर्यादा पुरुष रितीचा रितकारी हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी व नाट्यप्रेमींनी या सर्व कार्यक्रमांचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जय हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मळगाव ब्राह्मणआळी-पिंपळवाडी येथील हनुमान मंदिरात १२ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा…
