इन्सुली येथील अपघातात जखमी झालेल्या संतोष तारी यांचे निधन…

बांदा/प्रतिनिधी
इन्सुली येथे महामार्गवर रविवारी (ता. ६) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले बांदा येथील संतोष शांताराम तारी (वय ५४) यांचे गोवा-बांबोळी येथे उपचार सुरु असताना काल सायंकाळी उशिरा दुःखद निधन झाले.
. इन्सुली डोबवाडी येथे रविवारी (ता. ६) अज्ञात रिक्षाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले होते. या अपघातात त्यांची पत्नी गौरी व मुलगा श्रेयस यांना देखील दुखापत झाली होती. तारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना काल बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. ते उत्कृष्ट कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकात तसेच मलीकेत काम केले होते. त्यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे मुळ गाव मणचे (ता. देवगड) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

You cannot copy content of this page