अजिंक्य देसाई:जिल्ह्यात आज पासून काँग्रेसच्या बैठका..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमय बनवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी ठोस पावले उचलली आहेत नुकताच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा झालेला दौरा लक्षात घेता जिल्ह्यात ग्रामीण भागात काँग्रेस संघटना वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने जिल्हा कार्यकारणीसह तालुक्यात बैठका होणार आहेत उद्या सोमवारी जिल्हा कार्यकारिणीच्या ओरोस येथे येणाऱ्या बैठकीत संघटना पातळी बरोबरच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या योगदानात कोणकोणते उपक्रम राबवता येतील या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष वाटचाल करेल असे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांनी सांगितले दरम्यान महायुतीमध्ये विभिन्न मते असल्याचे चित्र सर्रास दिसत आहेत हे चित्र सातत्याने राहिल्यास काँग्रेस पक्षासाठी ते उपयुक्त ठरणार आहे असेही सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण सावंतवाडी व कणकवली विधानसभा मतदार संघ लक्षात घेता अलीकडेच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने वाटचाल केली आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला पराभव लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक जोमाने वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य देसाई जिल्हा दौऱ्यावर आले आहेत उद्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे जिल्हा कार्यकारणीची बैठक होणार आहे या बैठकीत नियोजन केले जाणार दरम्यान याबाबत बोलताना श्री देसाई म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ही तळागाळात पोचवण्यासाठी आता पक्ष संघटना सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे नूतन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात ही कोकणातून केली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या दौऱ्यास सुरुवात झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत या तिन्ही मतदारसंघात पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत विशेष म्हणजे युवाशक्ती ही काँग्रेस पक्षाकडे यावी यासाठी सुद्धा विविध उपक्रम राबवण्यावर भर देणार आहोत जिल्ह्यात पक्षाची राजकीय स्थिती पाहता महायुतीमध्ये विभिन्न मते असल्याचे चित्र सर्रास दिसत आहेत हे चित्र सातत्याने राहिल्यास काँग्रेस पक्षासाठी ते उपयुक्त ठरणार आहे येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा धर्म पाळावा की आगामी निवडणुका या स्वबळावर लढवाव्यात या दृष्टिकोनातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल असणार आहे तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी काँग्रेस हा जिवंत पक्ष आहे दरम्यानच्या कालावधीत संघटना वाढीसाठी कोणतेही म्हणावे तेवढे प्रयत्न झाले नाही आता प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार उद्या सोमवारी बैठक ही नियोजना संदर्भात होणार आहे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांची कामगिरी संघटना वाढवण्यासाठी योग्य आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तालुका निहाय नियोजन बैठक होणार आहेत संघटना वाढवण्याबरोबरच सामाजिक शैक्षणिक क्रीडा या क्षेत्राशी निगडित असणारे उपक्रम राबवता येईल पक्षाचे ध्येय धोरण तळागाळात कशी पोहोचवता येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे श्री सपकाळ यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील गोपुरी आश्रम येथे झालेली बैठक लक्षात घेता या बैठकीला जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गाबरोबरच सर्व सामान्य वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात होता त्यावेळी सुद्धा पक्ष संघटना वाढविण्याबाबत पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा झाली ग्रामीण भागात काँग्रेसचा जुना वर्ग आजही असून त्यांचे मार्गदर्शनही या संघटना बांधणीबाबत घेणार असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले
आज ओरोस येथे बैठक
सोमवार दिनांक ०७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा माध्यमिक शिक्षक पतपेढी हाॅल,ओरोस जिल्हा बॅंकेच्या शेजारी येथे सकाळी ठिक ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी अजिंक्य देसाई आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरिक्षक . शशांक बावचकर उपस्थित राहणार आहेत. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार श्री देसाई श्री बावचकर जिल्हा काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत
श्री बावचकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 7,8,9 एप्रिल या 3 दिवसांच्या जिल्हा भेटीसाठी येत आहेत सोमवार ०७ रोजी सकाळी ११-०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची बैठक सायंकाळी ४.०० वाजता दोडामार्ग तालुका काँग्रेस कमिटीची बैठक मंगळवार ०८ रोजी
वेंगुर्ला तालुका काँग्रेसची बैठक सकाळी १०-०० वाजता स्थळ- हाॅटेल किनारा,भटवाडी सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक.सकाळी १२-३० वाजता
कुडाळ तालुका काँग्रेसची बैठक दुपारी ०३.३० वाजता,कणकवली तालुका काँग्रेसची बैठक संध्याकाळी ०६.३० वाजता स्थळ- कणकवली तालुका काँग्रेस कार्यालय.बुधवार ०९ रोजी मालवण तालुका काँग्रेसची बैठक. सकाळी ११.०० वाजता.देवगड तालुका काँग्रेसची बैठक दुपारी ०२.३० वाजता.
वैभववाडी तालुका काँग्रेसची बैठक.
संध्याकाळी ०५.३० वाजता.तरी जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, महिला काँग्रेस, सेवादल, युवक काँग्रेस, एन एस यु आय, सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी, माजी जि. प., पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक, आजी माजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
