कौटुंबिक सल्ला केंद्राचा उपक्रम
*💫मालवण दि.२४-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्रच्या सांगाती या उपक्रमांतर्गत कोविड नंतरची काळजी या विषयावर २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. गार्गी ओरसकर या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण बॅ. नाथ पै सेवांगण मालवण फेसबुक पेजवरून होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
