महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी हरिश्चंद्र आसयेकर..

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत कार्यरत

*💫सावंतवाडी दि.२४-:* जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय देणारे तसेच कर्मचार्‍यांच्या सेवा – शर्ती बाबत सतत झटणारे मळगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर यांना राज्य ग्रामपंचायत .कर्मचारी संघटनेच्या कार्यकारणीवर प्रसिध्दी प्रमुख पदी निवङ करण्यात आली. राज्याध्यक्ष श्री.लक्ष्मण सुरळकर व सरचिटणीस श्री.धनराज पाटील यांनी याबाबतची घोषणा केली कोकणातुन श्री.आसयेकर यांना संधी मिळाल्याने सर्व स्तरावरुन त्यांचे अभिनंदन होत आहे! मिळालेल्या पदाचा वापर हा कर्मचार्‍यांना न्याय देण्यासाठी केला जाईल असे संबोधित करुन राज्य संघटनेचे आभार मानले!

You cannot copy content of this page