मालवण सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांचा सन्मान…

⚡मालवण ता.०१-:
बाँबे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, तासगाव सांगली या संस्थेने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुका शाखा अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या कार्याची दखल घेत आपल्या संस्थेमार्फत त्यांचा गौरव केला आहे.

‘बाँबे ब्लड ग्रुप’ ही संस्था जागतिक स्तरावरील अत्यंत दुर्मिळात दुर्मीळ रक्तगटाविषयी विशेष कार्य करते. देशासह जगातील या रक्तगटाच्या सदस्यांची ही संघटना आहे. आजवर या संस्थेनें अनेक रुग्णांचे प्राण या रक्तगटाचा पुरवठा करून वाचविले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातही ‘या संस्थेचे संस्थापक व ‘बाँबे ब्लड ग्रुप’ चे (Oh किंवा Hh) दाता विक्रम यादव यांनी रक्तदान केले आहे. यादव यांनी नेहमीच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेतली आहे. तसेच यापूर्वी संस्थेचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.

रक्तमित्र यावेळी सिंधु प्रतिष्ठानच्या मालवण तालुका शाखा अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या कार्याची दखल घेत आपल्या संस्थेमार्फत गौरव केला आहे. शिल्पा खोत यांनी रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून संस्थेच्या उद्देशांशी निगडीत दिलेले योगदान लक्षात घेऊन, या पुरस्काराकरिता त्यांची निवड करण्यात आली. एका महिला कार्यकर्तीने रक्तदान क्षेत्रात मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी शिल्पा खोत यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page