पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन शिष्यवृत्ती…

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्या वतीने दरवर्षी विविध विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते. यावर्षी पाट हायस्कूलच्या वैभवी रघुनाथ कोनकर, शालिनी रामचंद्र यादव, भाग्यश्री दत्ताराम गोडकर आणि अंकिता बाबू झोरे या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते. विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे आभार मानण्यात आले. ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी व्यवस्थापक प्रसाद परब, लक्ष्मण देसाई आणि स्वप्निल नाईक यांचेही आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page