आंबोली,ता.२६-: वन विभागाने चौकुळ केगदवाडी येथे सस्याची शिकार करताना चोघांना पकडले. याप्रकरणी चौघाना वन विभागाने तब्यात घेतले आहे. वन्य प्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यानुसार दशरथ बाबुराव राऊळ,प्रशांत सदानंद कुबल, सखाराम चंद्रकांत राऊळ,रा.मांडखोल, अमोल नामदेव गावडे ,चौकुळ,यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वन क्षेत्रपालं प्रमिला शिंदे ,मेहबूब अप्पासो नाईकवडे ,वनपाल देवसू, संकल्प दिलीप जाधव, वनरक्षक मसुरे,संग्राम पाटील,वनरक्षक तपासणीनाका,आदित्य लाड,वन रक्षक वेर्ले,एकनाथ पारधी,मंगेश सावंत,प्रथमेश गावडे,राकेश अमृस्कर यांनी कारवाई केली. हत्त्ती साठी वन खात्या ची गस्त सुरु असताना ही कारवाई करण्यात आली.
चौकुळ मध्ये सस्याची शिकार प्रकरणी चौघे ताब्यात…
