⚡बांदा ता.१९-: येथील नट वाचनालयात नेरुरकर परिवार पुरस्कृत आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक (कै.) प्र.श्री. नेरूरकर स्मृती खुल्या वाचक स्पर्धेत हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या खुल्या वाचक स्पर्धेसाठी साहित्यिक जयवंत दळवी व चि. त्र्यं. खानोलाकर यांच्या साहित्यासंबंधी परीक्षणात्मक विचार होते. स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सौ. भक्ती महाजन व सौ. सोनाली गोडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सौ. शुभेच्छा सावंत व सौ. अंकिता पाटील यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धा वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, संचालक शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, महिला संचालिका सौ. स्वप्निता सावंत, अंकुश माजगावकर, परीक्षक बाळकृष्ण राणे, चंद्रकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर (कै.) नेरुरकर यांच्या प्रतिमोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पाणदरे यांनी केले. यावेळी वाचक पालक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
