⚡बांदा ता.१८-: माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस-दांडेली येथे महाराष्ट्र शासन श्रम व रोजगार मंत्रालय मुंबई यांच्या वतीने सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी ‘रोजगार व संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे.
शिबिरासाठी येताना सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, यु .डी. आयडी कार्ड ,आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट साईज दोन फोटो (प्रत्येकी दोन प्रतीने )घेऊन यायचे आहेत. या शिबिराचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेचा दिव्यांगांसाठी व्यवसाय व तंत्र शिक्षण अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्याचा मानस आहे.
सदर शिबिर माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस- दांडेली, तालुका सावंतवाडी,( पारिजात मंगल कार्यालय शेजारी) येथे संपन्न होणार आहे.
अधिक माहितीसाठी मो. ९६७३३६६३०५, ९९२३६४४३०० या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोस-दांडेली येथे रोजगार व संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…
