सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने कुडाळात इफ्तार कार्यक्रम…

होळी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजन:भविष्यात गावागावात होणार आयोजन..

कुडाळ : सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांचेद्वारे पवित्र होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ येथे “इफ्तार कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले होते.
या सर्वधर्मीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिस्चन बांधवानी बहुसंखेने सामील होत कार्यक्रम यशस्वी केला.
या प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन चे श्री. एजाज नाईक यांनी संस्थेचे आरोग्य विषयक कार्य आणि संस्था मस्जिद, मदरसा येथे आयोजित करत असलेल्या रक्तदान शिबिरांची माहिती दिली आणि पवित्र होळी आणि रमजान सणाच्या सर्वाना शुभेच्छा देत कार्यक्रमाचाउद्देश विषद केला.
जेष्ठ कातळशिल्प अभ्यासक श्री. सतीश लळीत, अॅडव्होकेट संदीप निंबाळकर, अॅडव्होकेट सुहास सावंत, अॅडव्होकेट उमा सावंत, जेष्ठ पत्रकार मोहन जाधव, अॅडव्होकेट रईस पटेल, अॅडव्होकेट अशफाक शेख यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि समाजात प्रेम आणि आदरभाव वृद्धींगत व्हावा यासाठी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन करत असलेल्या कार्याची नोंद सर्वजण घेतील आणि भविष्यात असे कार्यक्रम गावागावात होतील असे सुतोवाच केले. यावेळी बोलताना अभय शिरसाट, श्री. धीरज परब यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आणि कुडाळ मध्ये पुर्वम्पार असलेला धार्मिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्व कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली, तसेच सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन द्वारे कोरोन काळात देखील आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराविषयी गौरवोद्गार काढले. पत्रकार श्री. बाळा राणे यांनी देखील उपस्थित राहत कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
यावेळी श्री. आनंद परुळेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, चार्टर्ड अकौंटंट श्री. सागर तेली, श्री. प्रसाद शिरसाट, श्री. संजय वेतुरेकर सर, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे श्री. अभय शिरसाट, मनसे पक्षाचे श्री. धीरज परब, श्री. किनळेकर, श्री. गावडे, कुडाळ चे नगरसेवक श्री. अभी गावडे, श्री. राजीव कुडाळकर, श्री. उदय मांजरेकर, माजी नगरसेवक श्री. राकेश कांदे, श्री. आबा धडाम, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे श्री. मंदार शिरसाट, श्री. विद्याप्रसाद बांदेकर, भारतीय जनता पक्षाचे श्री. राजू गवंडे, श्री. जयंत प्रसाद रेगे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. कुंटे, श्री. ओमकार शिरसाट, श्री. प्रसाद कुडाळकर, श्री. भूषण कुडाळकर, श्री. महेश तेंडोलकर, कुडाळ नगर पंचायतचे अधिकारी श्री. राजू पठाण साहेब यांनी देखील उपस्थित राहत कार्यक्रमाचा उद्देश सफल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक मा. श्री. मगदूम साहेब, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. पाळावे साहेब, सह. पोलीस उपनिरीक्षक श्री. रुपेश सारंग यांनी उपस्थित राहत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आणि सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या कार्याचा गौरव केला.
सिंधुदुर्ग मिल्लत फौंडेशन च्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमाचे नेटके आयोजन करत सहभागी झालेल्या समाजबांधवांचा पाहुणचार केला. यावेळी श्री. सिराज शाह, हाफिज नाझीम, श्री. मुश्ताक शेख, श्री. रेहान शेख, श्री. मुनाफ शेख, श्री. पडवेकर, श्री. अमजद शेख, श्री. अमीन हकीम, श्री. सर्फराज नाईक, श्री. रफिक मेमन, श्री. इकबाल मेमन, हाफिज जहेज शेख, श्री. आदिल शाह, श्री. तबरेज आजगावकर, श्री. इम्रान मुजावर, श्री. मोहसीन बागवान, श्री. जमीर पटेल, श्री. तबरेज शेख, श्री. बशिरुद्दिन शेख, श्री. साजिद दोस्ती, श्री. नियाज शाह, श्री. अय्याज दोस्ती, श्री. आबू दोस्ती, श्री. मुस्तकीन बागवान, श्री. अनिस दोस्ती, श्री. मुबीन दोस्ती, श्री. मकसूद खान, श्री. आजीम मुजावर, श्री. शरफुद्दीन शेख आदी बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page