जिल्हास्तरीय निबंध व हस्ताक्षर स्पर्धेत सुयश सद्गुरु साटेलकर प्रथम…

⚡मालवण ता.१८-:
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांनी संत रविदास यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध आणि हस्ताक्षर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमार सुयश सद्गुरू साटेलकर याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांनी संत रविदास यांच्या जीवन चरित्रावर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते .या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमार सुयश सद्गुरू साटेलकर सहभागी झाला होता. त्याने ‘संत रविदास महाराज यांचा जीवनपट’ या विषयावर निबंध सादर केला होता या निबंधाला शालेय गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तसेच या मंडळांने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली होती. या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सुद्धा सुयश सद्गुरु साटेलकर याला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.

या सुयशच्या दुहेरी यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या हस्ते त्याचा सन्मान केला गेला.यावेळी त्यांच्या सोबत स्कूल समिती सदस्य राजन पांगे,बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, अंकुश घुटूकडे, प्रकाश महाभोज,शेलार, सद्गुरू साटेलकर,शिक्षकेत्तर कर्मचारी आचरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page