⚡मालवण ता.१८-:
७२ वी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दिनांक १९ ते २३ मार्च या दरम्यान ठाणे येथील जे के केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या सहकार्याने होत असून याकरता सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन च्या वतीने सिंधुदुर्ग पुरुष व महिला गटाचे संघ निवडण्यात आले आहेत. हे दोन्ही संघ या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत..
यामध्ये वरिष्ठ पुरुष कबड्डी संघ चेतन राणे कर्णधार, गणपत दाभोळकर उपकर्णधार,साहिल तावडे, कुणाल गावडे, अक्षय चव्हाण, विराज बागवे, समिल गावडे, बाळू तांबे, श्रेयांश मूरचिटे, प्रथमेश आढाव, अथर्व गावडे आणि प्रशिक्षक पराग वालावलकर, व्यवस्थापक विवेक नेवाळे.. आणि महिला कबड्डी संघ काजल नार्वेकर कर्णधार, रिद्धी हडकर उपकर्णधार,सेवा होडावडेकर, सानिका पावशे, प्रज्ञा शेटये, वैष्णवी नाईक, पलक गावडे, मिताली गावडे, साक्षी मस्के, सानिका नाईक, रेशमा पांढरे, प्रतीक्षा शेलार आणि प्रशिक्षक नितीन हडकर, व्यवस्थापक सौ राखी हडकर यांची निवड करण्यात आली आहे.
निवड समितीचे अध्यक्ष तुषार साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष व महिला कबड्डी संघाची निवड समितीच्या वतीने करण्यात आली. निवडलेल्या दोन्ही संघाचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सदर निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मसुरे डांगमोडे येथे नुकतीच घेण्यात आली होती.
