जिल्ह्यात २० पासून सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग…

राज्यातील सहा जिल्हे सहभागी:उद्या सायंकाळी कुडाळ मध्ये उदघाटन..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व अँड संग्राम देसाई, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच”सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग”  2025 आयोजन 20 ते 23 मार्च कालावधीत सावंतवाडी व मालवण येथे करण्यात आले आहे स्पर्धेचा शुभारंभ सोहळा उद्या 19 मार्चला कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता कुडाळ एम आय डी सी येथील बॅरिस्टर नाथ पै कॉलेजच्या भव्य मैदानावर होणार आहे  चार दिवस चालणाऱ्या सामन्यात महाराष्ट्र राज्यातील सहा जिल्हे सहभागी झाले आहेत आठ संघामधून 109 खेळाडू खेळणार असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अँड संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली   
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग स्पर्धा होत आहे याबाबत आज येथील लाईम लाईट हॉटेलच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी अँड  अमोल सामंत अँड विवेक मांडकुलकर अँड यतीश खानोलकर अँड अविनाश परब अँड मिहिर भणगे, अँड महेश शिंपूकडे,अँड आनंद गवंडे अँड प्रथमेश नाईक  उपस्थित होते यावेळी बोलताना अँड देसाई म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व अँड संग्राम देसाई, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग” चे आयोजन करण्यात आलेले आहे. या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सोलापूर, सांगली, सातारा ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा येथील उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे मिळून एकूण 137 वकिलांनी स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेची लिलाव प्रक्रिया  5 मार्च 2025 रोजी पार पडली   वकिलांचे लिलाव प्रक्रियेतून या स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे .सदर स्पर्धेत एकूण आठ संघमालकांनी संघ  घेतलेले आहेत .त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अँड अनिल निरवडेकर व अँड नीलिमा गावडे , तसेच कोल्हापूर जिल्हा मधून रवींद्र जानकर व अमित सिंग ,सांगली जिल्हा मधून अँड प्रशांत जाधव, सातारा जिल्हा मधून अँड श्रीकांत पन्हाळे व गोवा मधून अँड अनुप कुडतरकर व सोलापूर जिल्हा मधून अँड श्रीकांत फटाते असे आठ संघ मालक आहेत. सदर स्पर्धेचे  प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 55555 व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रक्कम रुपये 33333 व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ पारितोषक रक्कम रुपये 11111 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे सदरची स्पर्धा ही 20 ते 23 मार्च 2025 या कालावधीत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा उद्या 19 मार्चला कुडाळ एम आय डी सी येथील बॅरिस्टर नाथ पै कॉलेजच्या भव्य मैदानावर सायंकाळी 7 वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे 20 व 21 मार्च रोजी वरील आठ संघांमध्ये साखळी सामने सावंतवाडी येथील जिमखाना मैदान व मालवण येथील बोर्डिंग ग्राउंड येथे होतील व 22 मार्च रोजी सेमी फायनल तसेच 23 मार्च रोजी अंतिम सामन्याचे आयोजन हे मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी या आगळ्यावेगळ्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घ्यावा व स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवावी आठ संघाचे संघ मालक व त्यांच्या संघातील खेळाडूंची माहिती व कोणता संघ कोणत्या तारखेला कोणत्या मैदानावर खेळेल याची देखील माहिती उपलब्ध असेल लीग पद्धतीचे सामने 15 षटकाचे राहतील उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने 20 षटकांचे असतील

You cannot copy content of this page