⚡सावंतवाडी ता.१७-: कुडाळ मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहरातील रुग्णालये, शासकीय आस्थापनांमध्ये मोफत पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे युवा नेते आ. निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरासह तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जात आहे. शिवसेना, संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून यानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनाथाश्रम तसेच विविध शासकीय आस्थापनांमध्ये मोफत पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले. यावर्षी तीव्र उन्हाळा असल्याने रुग्णालयातील रुग्ण इतर कर्मचारी तसेच शाळांमधील विद्यार्थी व इतर आस्थापना मधील कर्मचारी व नागरिक यांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी हे जार वाटप करण्यात आले आहेत. याबाबत सर्व आस्थापने तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या वितरण प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, गजानन नाटेकर, मंदार नार्वेकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, संदेश सोनुर्लेकर, प्रशांत साटेलकर, परीक्षित मांजरेकर, सत्यवान बांदेकर, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, सचिन साटिलकर विनोद सावंत, माजी नगरसेविका भारती मोरे, दीपाली सावंत, लतिका सिंग, ज्योत्सना मेस्त्री, पूजा नाईक, सुप्रिता धारणकर, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याच्या जारचे वाटप…
