वैभववाडी प्रतिनिधी
करुळ घाटमार्गे गगनबावडा ते वैभववाडी अशी देखील वाहतूक सोमवार सकाळपासून सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबतचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. घाटातून येणारी- जाणारी अशी दुहेरी वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
४ मार्चपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर कडे जाणारी एकेरी एसटी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तर सोमवार सकाळपासून करुळ घाटमार्गे येणारी व जाणारी वाहतूक सुरू करण्याबाबतचे आदेश एसटी विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक यांना दिले आहेत. करुळ घाटमार्गे दुहेरी एसटी सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तब्बल तेरा महिन्यांनंतर ही वाहतूक सुरू झाली आहे.
वैभववाडी- करुळ घाटमार्ग ते गगनबावडा रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू असल्याने करूळ घाट मार्गावरील सर्व वाहतूक २२ जानेवारी २०२४ पासून बंद करण्यात आली होती. सदर मार्गावरून जाणारी एसटी वाहतूक फोंडा व भुईबावडा या मार्गे वळविण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी – करुळ घाटमार्गे संपूर्ण ती वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करूळ घाटमार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या फेऱ्या व कोल्हापूरकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या फेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत. एसटी वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी सुखावले आहेत.
करुळ घाटमार्गे गगनबावडा ते वैभववाडी वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांकडून समाधान…
