महिला दिनानिमित्त स्वच्छतेत काम करणाऱ्या महिलांचा सत्कार…

तालुका, ग्राम पातळीवर आयोजन:प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांची माहिती.

ओरोस ता ६
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी, स्वच्छता क्षेत्रात अंमलबजावणी करिता महिलांचे अमुल्य योगदान आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वच्छता क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा तालुका व ग्रामस्तरावर सत्कार करण्यात येणार असून, जागतीक महिला दिना निमीत्त विविध उपक्रम ग्रामपंचायत व तालुकास्तरावर महिला सहभागातून राबविण्यात येणार आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन विशाल तनपुरे यांनी दिली आहे.
स्वच्छता क्षेत्रात नेतृत्व करणे, स्वच्छता मालमत्तेचे व्यवस्थापन करणे, स्वच्छतेसाठी प्रोत्साहन देणे व स्वच्छतेची शाश्वतता सुनिश्चित करणे, जनजागृती करणे आदी बाबींच्या अनुषंगाने महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जेणे करुन गावे खऱ्या अर्धाने जलसमृध्दी होतील आणी शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करतील. हाच धागा पकडून ग्रामीण भागात पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
जागतिक महिला दिना निमित्त पाणी व स्वच्छता व आरोग्य संबधी प्रोत्साहन मिळणेसाठी महिलांची विशेष धाव आयोजित करणे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये वॉश रन आयोजित करून महिला, किशोरवयीन चॅम्पियन, स्वच्छता कर्मचारी, व्ही डब्लू एस सी सदस्य व स्थानिक पातळीवरील प्रभावशाली महिलांचा समावेश यात असणार आहे. जे ग्रामीण वॉशचे संदेश प्रसारित करतात अशाचा सहभाग असणार आहे. तालुका स्तरावर सत्कार सोहळा अयोजित करून ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती संबधीत सुयोग्य व्यवस्थापन करणारे महिला नेतृत्व, किशोवयीन चॅम्पियन, एफ टी के व्दारे पाणी गुणवत्ता व सनियंत्रण करणाऱ्या महिला इत्यादी महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तालुक्यातील गावांमध्ये विशेष ग्रामसभेंचे आयोजन करुन पाणी स्वच्छता व आरोग्य या बाबत येणा-या अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच वॉश कार्यक्रमांच्या समस्यांवर महिलांचा सहभाग घेऊन ग्रामपंचायत पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे. पंचायत विभाग, पंचायत समिती यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून किमान १ महिला अनुकुल आदर्श ग्रामपंचायती संबधित मॉडेलची उभारणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page