चिमणी पाखर डान्स अकॅडेमिचा १५ मार्च ला नृत्य सन्मान सोहळा…

नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांची प्रमुख उपस्थिती :निलेश उर्फ बंड्या जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर..

⚡कुडाळ ता.०६-: चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ यांच्या वतीने शनिवार दि. १५ मार्च २०२५ रोजी नृत्य सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी पाच वाजता फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. यावर्षी नृत्यक्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार नाट्य दिग्दर्शक, लेखक, निवेदक, पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी याना जाहीर झाला आहे. तर विशेष कर्तृत्व पुरस्काराने कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हीचा सन्मान केला जाणारा आहे. अशी माहिती चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे व अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो अर्थात नृत्य सन्मान सोहळा हा शनिवार दि. १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता मराठा समाज हॉल येथे होत आहे. सन्मान सोहळ्याचे दुसरे वर्ष असून येथील कलावंतांना व्यासपीठावर मिळावे त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा हा दूरदृष्टीकोन ठेवून हा सन्मान सोहळा केला जात आहे सन्मान सोहळ्याचे दुसरे वर्ष असून याबाबत आज लेमनग्रास येथील सभागृहात पत्रकार परिषद देऊन ही माहिती देण्यात आली. यावेळी सतीश पावसकर निखिल कुडाळकर संजना पवार आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना सुनील भोगटे म्हणाले चिमणी पाखरडान्स अकॅडमी च्या माध्यमातून गेल्या वर्षापासून नृत्य सन्मान सोहळा सुरू करण्यात आला. यावर्षी जिल्ह्यातील ८० कलाकारांचा सन्मान होणार आहे. या वर्षी नृत्य सन्मान सोहळ्यासाठी इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांची प्रमुख उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण आहे. सोबतच जिल्ह्यातील नृत्यांगना दीक्षा नाईक हिची आशिष पाटील यांच्या सेलिब्रिटी कलाकाराच्या ‘सुंदरी’ या डान्स शो मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अकॅडमीचे अध्यक्ष रवि कुडाळकर यांनी सर्वांच्या सहकार्याने हा दुसरा नृत्य सन्मान सोहळा होत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून दुसऱ्या दिवशी १६ मार्चला जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यां नृत्यांगनासाठी एक दिवसाचे नृत्य प्रशिक्षण हॉटेल लेमनग्रास येथील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे त्याचा लाभ नृत्य कलावंतांनी घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा निलेश उर्फ बंड्या जोशी व विशेष कर्तृत्व पुरस्कार कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांना जाहीर करण्यात आलेला आहे असे सांगितले
निलेश उर्फ बंड्या जोशी हे गेले कित्येक वर्ष सिने नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. नृत्य क्षेत्रातही त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. ते स्वतः हे उत्कृष्ट फोक डान्सर आहेत. एकूणच त्यांच्या कित्येक वर्षाच्या कला क्षेत्रातील प्रवास लक्षात घेता त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांनी गेल्या पंधरा वर्षात सिंधुदुर्गसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यात नृत्य कलेतून आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. विविध टीव्ही चॅनल तसेच निमंत्रित नृत्य मिळून तिने २ हजार ९८० कार्यक्रम केले आहेत. या तिच्या कार्याचा गौरव म्हणून तिला विशेष कर्तृत्व पुरस्काराने आशिष पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page