दोडामार्गच्या कन्येची गोवा क्रिकेट संघात निवड…

ऑलराऊंडर खेळाडू म्हणून झालीय निवड..

⚡दोडामार्ग, ता.३-: तालुक्यातील खानयाळे येथील साक्षी बंड्या गावडे हिची महिलांच्या गोवा क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
साक्षी सध्या दहिसर, मुंबई येथे स्थायिक असून तिची २३ वर्षाखालील महिलांच्या गोवा क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
साक्षीने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून तिच्या शैक्षणिक आणि खेळाच्या कारकिर्दीचा एकत्रित प्रवास अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणादायक ठरला आहे.तिच्या निवडीमागे कठोर परिश्रमाचा आणि सातत्याचा हात आहे. साक्षीच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page