⚡बांदा ता.०३-: स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता घारपी मुख्य रस्त्याचे काम अचानकपणे सुरु करण्यात आल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत काम बंद पाडले. याबाबत ग्रामस्थांनी येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्याशी संपर्क साधत कैफियत मांडली. कल्याणकर यांनी ग्रामस्थ व ठेकेदार यांची गावात संयुक्त बैठक घेत यशस्वी शिष्टाई करत यावर तोडगा काढला. ग्रामस्थ व ठेकेदार यांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याने पुनःच्छ कामाला प्रारंभ करण्यात आला.
घारपी मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मंजूर करण्यात आल्याने ठेकेदाराने अचानक कामास सुरुवात केली. स्थानिकांना विश्वासात न घेता काम सुरु करण्यात आल्याने गावात जाणारी एकमेव एसटी बस बंद करण्यात आली. एसटी बंद झाल्याने ग्रामस्थासह शालेय विद्यार्थ्यांचे हाल झालेत. सध्या परीक्षा सुरु असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत काम बंद पाडले. तसेच याची कल्पना कल्याणकर यांना दिली. कल्याणकर यांनी ग्रामस्थ तसेच ठेकेदाराशी चर्चा करत गावात संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित केले. नुकतीच घारपी येथील मंदिरात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी रस्ता गटार कामासाहीत पूर्ण करणार. घारपी गावातील सार्वजनिक कमांकरिता ठेकेदाराने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी देखील गावाच्या विकासासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्याने कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील समस्याबाबत तात्काळ हजर राहून सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी श्री कल्याणकर यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी फुकेरी घारपी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आनंद गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:-
घारपी येथे ग्रामस्थ्यांसोबत चर्चा करताना गुरु कल्याणकर व इतर.
फोटो:-
घारपी मुख्य रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
समाजसेवक गुरू कल्याणकर यांच्या शिष्टाई नंतर बंद पडलेले घारपी रस्त्याचे काम पुन्हा सुरू…!
