जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ रोजी मळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.०३-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मध्ये रविवार दिनांक ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
(कै.) यशवंती धोंडू खानविलकर- पटेकर स्मृतिप्रीत्यर्थ उज्ज्वला यशवंतराव खानविलकर पुरस्कृत आयोजित कार्यक्रमात मळगाव गाव मर्यादित महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम नोंदणी करणार्‍या वीस महिलांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. ‘नाचणीपासून बनवलेला पदार्थ’ हा विषय आहे. तरी इच्छुक महिलांनी वाचनालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.
या पाककौशल्य स्पर्धेसोबतच महिला दिनानिमित्त मळगावच्या स्नुषा सौ. रुपाली गुडेकर, अनमोल प्रभाग संघाच्या व्यवस्थापक यांना उमेदच्या कार्यात विषेश अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते वाचन मंदिर च्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्य महिलांनी सहभागी होऊन उपस्थिती दर्शवावी राहून असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page