दिव्यसोहळा पाहण्यासाठी मिठबाव,तांबळडेग कातवण गावच्या गावघर रयतेची उपस्थिती.
⚡देवगड ता.२४-: देवगड तालुक्यातील मिठबाव तांबळडेग, कातवण गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर देवालयामध्ये सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी देव तरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा बारापाच मानकरी संपूर्ण गावघर रयतेच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी बारापाच मानकरी ,व मिठबाव तांबळडेग कातवण या तिन्ही गावातील सर्व गावघर रयत मोठ्या संख्येने हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
