कणकवली : कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ ते डीपी रोड दरम्यान चिठ्ठीद्वारे कल्याण मटका स्वीकारताना आढळून आल्याबद्दल गजानन बाबाजी तिरोडकर (वय ६५, रा. टेंबवाडी, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष शिवगण यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता केली. आरोपी कडून रोख रु. २ हजार ७४० व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कल्याण मटका घेताना कणकवलीत एकावर गुन्हा दाखल…
