जलजीवन मिशनची कामे लवकर पूर्ण करा…

मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची सूचना:कणकवलीत ‘जलजीवन’च्या कामांबाबत आढावा बैठक..

कणकवली : जलजीवन मिशन अंतर्गत कणकवली तालुक्यात सुरु असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत. कामांबाबत असलेल्या अचडणी मार्गी लागण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी सुरु असलेली लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले.

जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठीची बैठक पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात जि.प.चे सीईअो मकरंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विनायक घेवडे, कार्यकारी अभियंता सुरेश राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. वालावलकर, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा ठेका घेतलेल्या ठेकदारांनी आपणास भेडसावत असलेल्या अडचणी सीईअोसमोर मांडल्या. कामे करूनही वेळेवर निधी प्राप्त होत नाही, त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशी कैफियत त्यांनी मांडली. आपल्या अडचणी व समस्या मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जलजीवनची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी, अशी सूचना श्री. देशमुख यांनी ठेकेदारांनी केली.

जलजीवन मिशन अंतर्गत गावनिहाय सुरु असलेल्या कामांबाबत त्यांनी प्रत्येक सरपंचांशी वन टू वन चर्चा केली. तालुक्यात सुरू असलेली कामे लवकर पूर्ण होणे ही सरपंच, ठेकेदार, संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे, असे देशमुख यांनी सांगितले. जमिन प्रश्नांवरून रखडलेल्या कामांचा आढावा देशमुख यांनी घेत जमिनीचा प्रश्न मार्गी लावून कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना त्यांनी सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी केली. ठेकेदार रामू विखाळे यांच्यासह अन्य ठेकेदारांनी कामे पूर्ण करताना येत असलेल्या अचडणी व समस्या देशमुखांसमोर मांडल्या. ठेकेदरांच्या अडचणी व समस्यांना ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समजून घेऊन त्या सोडवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली. बैठकीत वारंवार काही ठेकेदार उभे राहून आपल्या कैयफिती मांडत होते. त्यांच्या या कृतीबाबत देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत बैठकीचा अजेंडा सेट असून तो भरकवटण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

बैठकीला सरपंच, ग्रामसेवक, ग्रामीण पाणीपुरवठा विभागचे कनिष्ठ अभियंता, कंत्राटी अभियंता, ठेकेदार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page