शिवजयंती निमित्त उद्योजक केदार झाड यांचेकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत छावा चित्रपट…

मालवण प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास समजावा या हेतूने मालवण मधील उद्योजक केदार मिलिंद झाड यांच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर येथे मोफत दाखविण्यात येणार आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या शोची वेळ सकाळी ८.३०, दुसऱ्या शोची वेळ सकाळी ११.०० असणार आहे. चित्रपट विहित वेळेत सुरू होणार आहे. चित्रपटाच्या शो साठी आपली जागा निश्चित करण्यासाठी ९४२३६८६१६५ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. मुलांना नेण्या आणण्याची जबाबदारी पालकांची राहील. आगावू नाव नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे

You cannot copy content of this page