मालवण (प्रतिनिधी)
मुंबई सारख्या महानगरात नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल मालवणचे सुपुत्र, भंडारी समाजाचे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सत्कार सोहळा सकल भंडारी हितवर्धव संस्था व भंडारी समाजाच्या वतीने मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चर, टुरीस्ट बोर्डचे चेअरमन श्री आशिष पेडणेकर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. नविनचंद्र बांदिवडेकर हे उपस्थित राहणार आहेत
या सोहळ्यास भंडारी ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणचे अध्यक्ष रविंद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनिल नाईक, प्रदीप वेंगुर्लेकर, सचिव पंकज पेडणेकर यांनी केले आहे
