सोनुर्ली येथील माऊली विद्यालयच्या तेजस परबची राज्यस्तरीय कबड्डी संघासाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी संघ निवड स्पर्धा १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून मुलांचे १३ आणि मुलींचे १० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्लीच्या संघाने देखील सहभाग घेतला होता.
स्पर्धेमध्ये माऊली विद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माऊली विद्यालयाचा विद्यार्थी तेजस ज्ञानेश्वर परब (इयत्ता – नववी, राहणार – न्हावेली.) याची अंतिम १५ खेळाडूंच्या संघात निवड झाली आहे.
येत्या एक-दोन दिवसांत या निवडलेल्या खेळाडूंसाठी माऊली विद्यालयात विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर हा संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार असून, माऊली विद्यालयाचा तेजस परब या संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तेजस परब याच्या या यशस्वी निवडीबद्दल श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दिगंबर मोर्ये, उपाध्यक्ष श्री आनंद नाईक, सचिव श्री नरेश मोर्ये, सहसचिव श्री नागेश गावकर, खजिनदार सौ. भारती गावकर, संचालक श्री शंकर गावकर, श्री भरत गावकर, श्री आनंदी गावकर, श्री लक्ष्मीदास ठाकूर, श्री शरद धाऊस्कर, श्री दीपक नाईक, श्री मुकुंद परब, श्री तेजस गावकर, श्री आनंद धडाम, श्री महेश राऊळ, श्री भूषण ओठवणेकर, श्री उदय गाड तसेच सल्लागार श्री गोविंद मोर्ये, मुख्याध्यापक श्री.तेरसे , शिक्षकवृंद श्री काकतकर , श्री.सावंत व शिक्षकेतर कर्मचारी श्री.नाईक, श्री.गावकर, श्री.जाधव, श्री.निर्गुण यांनी तेजसचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

माऊली विद्यालयासाठी ही बाब अत्यंत गौरवाची असून संपूर्ण पंचक्रोशीत त्याचे कौतुक केले जात आहे. तेजस परब याच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण विद्यालय व श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली तर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page