कलमठमध्ये 20 रोजी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा…

कणकवली : कलमठ येथील श्री गजानन महाराज सेवाश्रमात गुरुवार 20 फेब्रुवारीला श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी धार्मिक विधी, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, सायंकाळी 6 वा. झुणका-भाकरी प्रसाद वाटप, सायंकाळच्या सत्रात भजन, कीर्तन, हरिपाठ होणार आहे. तरी या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज सेवाश्रम यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page