आजगाव-धाकोरे येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने मुलांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१३-: शिवजयंतीचे औचित्य साधून आजगाव-धाकोरे येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने मुलांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जि. प.केंद्रशाळा आजगाव नं. १ येथे करण्यात आले आहे.
तसेच १९ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, सायंकाळी ७ वाजता सप्तरंग कला मंच होडावडा यांचे दोन अंकी ट्रीकसीन नाटक “ब्रह्मांडनायक” तसेच २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव धाकोरेच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी आणि इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या दोन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमाच्या किंवा कोणत्याही जिल्हा परिषद, माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेचा विषय त्याच दिवशी दिला जाणार आहे. प्रत्येक गटातून प्रत्येक शाळेतील जास्तीत जास्त पाच विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांची नोंदणी शाळेमार्फत करावी. विद्यार्थ्यांना कागद मंडळामार्फत दिला जाईल. विद्यार्थ्यांनी आपले रंग साहित्य स्वतः आणावयाचे आहे.
विद्यार्थ्यांना चित्र रंगवण्यासाठी कोणतेही रंग माध्यम वापरता येईल. दिलेल्या वेळेतच विद्यार्थ्यांनी चित्र काढायचे आहे आणि रंगवायचे आहे. चित्र काढताना कोणत्याही नमुना चित्राचा आधार घेता येणार नाही.
चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना
गट क्र. 1 – इयत्ता पहिली ते चौथी
प्रथम क्रमांक- रोख रुपये 2000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक – रोख रुपये 1500, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक – रोख रुपये 1000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
उत्तेजनार्थ 1 – रोख रुपये 500 व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ 2 – रोख रुपये 500 व प्रमाणपत्र.
इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक- रोख रुपये 2500, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक – रोख रुपये 2000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
तृतीय क्रमांक – रोख रुपये 1500, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह उत्तेजनार्थ 1 – रोख रुपये 1000 व प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ 2 – रोख रुपये 500 व प्रमाणपत्र पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी प्रतिक भगत- 7038443981/9421182412, प्रसाद मेस्त्री 9421149362, श्री कांबळी 9421631204 या नंबर वर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page