पणदूर मध्ये १६ ला बांधकाम कामगार स्नेहसंमेलन…

गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि आरोग्यशिबीर:श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे आयोजन..

⚡कुडाळ ता.१३-: श्रमिक कामगार कल्याणकरी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, कामगार मार्गदर्शन स्नेहसंमेलन आणि भव्य आरोग्य शिबीर व उपचार मार्गदर्शन अशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या रविवारी १६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता पणदूर हायस्कुल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली. ते आज कुडाळ मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना प्राजक्त चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी होणार आहे. पहिलीपासून त्यांच्या अंतिम शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यंचा यात समावेश आहे. अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्याच बरोबर कामगारांच्या हिताच्या महाराष्ट्र शासनाच्या सुमारे २५ योजना आहेत. त्या योजनांनबाबत सुद्धा यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. कामगारांची नोंदणीकेली जाते. त्यांची कार्डे काढली जातात. पण कष्टकरी वर्ग अजूनही यापासून वंचित आहे. काही कामगार नोंदणी करतात पण ते रिन्यूअल करत नाहीत. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द होते. लाभापासून वंचित राहतात. याची माहिती दिली जाणार आहे. असे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले.
तसेच या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी फक्त रक्त तपासणी केली जायची. पण आता विविध तपासण्या आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन देखील केले जाणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला कुडाळ अध्यक्ष नारायण येरम, वेंगुर्ला अध्यक्ष विजय बागकर, संजना पाटकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सुमारे २५ हजार बांधकाम कामगार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या चारही कामगार संस्थांकडे मिळून जिल्ह्यात सुमारे २५ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. या मध्ये बांधकाम क्षेत्रातले १०१ प्रकारची कामे करणारे कामगार समाविष्ट आहेत. तसेच हे २० ते २५ हजार कामगार सिंधुदुर्गातलेच आहेत, अशी माहिती श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली. निवडणूक आचारसंहितेमुळे सुरु असलेलं कामगार नोंदणी पोर्टल सुरु झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

You cannot copy content of this page