जेष्ठ नागरिक सावित्री काळे यांचे दुःखद निधन…

⚡वैभववाडी ता.११-:
उंबर्डे धनगरवाडी येथील जेष्ठ नागरिक श्रीम सावित्री जानू काळे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी उंबर्डे येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर उंबर्डे येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ व परोपकारी स्वभावामुळे सर्वांमध्ये त्या प्रिय होत्या
धनगर समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष शिक्षक नेते व माध्यमिक विद्यालय कासार्डे शाळेचे शिक्षक पांडुरंग काळे सर यांच्या त्या मातोश्री होय.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सूना, नातवंडे, पतवंडे आसा मोठा परीवार आहे.

You cannot copy content of this page