मळगावात 19 रोजी विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.११-:
भिल्लवाडी ग्रुप मळगाव, ग्रामविकास मंडळ मुंबई व मळगाव ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिव पुतळ्या शेजारी हा कार्यक्रम होणार आहे यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता शिवप्रेमींकडून मशाल रॅली हनुमंत गड फुकेरी ते शिवाजी छत्रपती चौक मळगाव अशी काढण्यात येणार आहे, त्यानंतर साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा होणार आहे दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजता मोटरसायकल व ढोल ताशा पथक रॅली होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी करण्यात येणार आहे त्यानंतर लेझीम नृत्य वेशभूषा वकृत्व स्पर्धा होणार आहे सायंकाळी सात ते आठ वाजता स्नेहभोजन व महिलांसाठी पैठणी व संगीत खुर्ची खेळ कार्यक्रम होणार आहे त्यानंतर रात्र आठ वाजता मर्दानी खेळ व बक्षीस समारंभ पार पडणार आहे तरी भरगच्च असलेल्या या कार्यक्रमाला सर्व मळगाव ग्रामस्थ शिवप्रेमी यांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन भिल्हवाडी ग्रुप मळगाव ग्राम विकास मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ तसेच मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page