⚡मालवण ता.०६-:
सुकळवाड बाजारपेठ येथील हनुमान मंदीर येथे दि. ८ व ९ फेबुवारी या कालावधी त श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज माणगांव यांचा पालखी दर्शन सोहळा आयोजीत केला आहे.
यानिमित्त शनिवार दि. ८ फेब्रवारी रोजी सकाळी ८.३० वाजता पालखी आगमन सुवासिनींद्वारा ओवाळणे, ८.३० ते ११ सुकळवाड वरचा नाका ते ब्राम्हण देव मंदीर साईमंदीर महापुरुष यांना भेट देऊन हनुमान मंदीर पर्यंत हरिनामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक, सकाळी ११ ते ११.४५ पादुका पुजन, दुपारी १२ वा. अखंड नामस्मरण सुरुवात, दुपारी १२.३० आरती व तिर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. महाराजांची करुणात्रिपदी व आरती, सायं. ७.३० वा. दिपोत्सव, रात्रौ ९.३० अखंड नामस्मरण, रविवार दि. ९ फेबुवारी पहाटे ५.३० वा. काकड आरती सकाळ ८ ते दुपारी १२ वा. पाद्यपुजा व अभिषेक (सर्वांसाठी खुला) दुपारी १२ ते १२ .३० वा. आरती तिर्थप्रसाद, दुपारी १ महाप्रसाद, पालखी परतीची मिरवणूक हनुमान मंदीर वरचानाका नंतर पालखी माणगांवकडे प्रयाण आदी कार्यकम आयोजित केले आहेत. तरी सर्व भाविक भक्तानी या पालखी दर्शन सोहळा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुकळवाड ग्रामस्थ यांनी केले आहे.
