नाडन येथील ६७ वर्षीय व्यक्ती उपचारासाठी मुंबईला जात असताना कणकवलीत निधन…

⚡देवगड ता.०६-:
नाडण येथील शंकर भिकाजी पाटील (६७) यांचे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा. च्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद कणकवली पोलीस स्थानकात करण्यात आली असून घटनेच्या पुढील तपासासाठी हे प्रकरण देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडण येथील शंकर पाटील हे गेली दहा वर्षे हृदयविकाराने त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वेने मुंबई येथे जाण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा. च्या सुमारास ते आपल्या पत्नीसमवेत गावाकडून एसटीने कणकवली बस स्थानकात पोहोचले. याचदरम्यान तेथे त्यांना चक्कर आली व ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेची फिर्याद निखिल नंदकिशोर मिराशी (साळशी- मिराशीवाडी) यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली. हे प्रकरण तपासासाठी देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले असून घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page