देवगड महाविद्यालय येथे उडान महोत्सव 2025 संपन्न…

महोत्सवात सहभागी झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ महाविद्यालये:पटनाट्य स्पर्धेत कणकवली, लेखन व पोस्टर मेकिंग स्पर्धेत केळकर, वकृत्व स्पर्धेत तळेरे, कॉलेज ठरली क्रमांकास पात्र..

⚡देवगड ता.०५-: मुंबई विद्यापीठाच्यावतीने आजीवन,अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित शिक्षण विस्तार मंडळ संचालित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड येथे उडान महोत्सव २०२५ चे मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.

         दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. सुधीर साटम यांनी केली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुमार कुनुरे, उपप्राचार्य डॉ. सुरवसे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद शेट्ये मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. कुणाल जाधव यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. कुणाल जाधव सर यांनी या शासनाची ध्येयधोरणे समाजासमोर पोहचविणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.

     या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ महाविद्यालये उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. यामध्ये पथनाट्य स्पर्धा, सर्जनशील लेखन ,वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धेत

पथनाट्य स्पर्धा : प्रथम क्रमांक: कणकवली महाविद्यालय,कणकवली द्वितीय क्रमांक :विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे तृतीय क्रमांक:आनंदीबाई रावराणे महाविद्यालय,वैभववाडी उत्तेजनार्थ: श्री स. ह. केळकर महाविद्यालय ,देवगड.

सर्जनशील लेखन स्पर्धा:प्रथम क्रमांक: श्री. स. ह.केळकर महाविद्यालय, देवगड द्वितीय क्रमांक: श्री. पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगाव तृतीय क्रमांक: आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी

वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक: विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे द्वितीय क्रमांक: डॉ. दादासाहेब वराडकर महाविद्यालय, कट्टा तृतीय क्रमांक: स. का. पाटील महाविद्यालय मालवण

पोस्टर मेकिंग स्पर्धा प्रथम क्रमांक: श्री स. ह केळकर महाविद्यालय, देवगड द्वितीय क्रमांक: स. का.पाटील महाविद्यालय ,मालवण तृतीय क्रमांक: फोंडाघाट महाविद्यालय ,फोंडा ऊतेजनार्थ : डॉ.दादासाहेब वराडकर महाविद्यालय,कट्टा

यांनी मिळविला. विजेत्यांना पारितोषिक देऊन प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे आणि डॉ. कुणाल जाधव यांचे हस्ते गौरविण्यात आले. देवगड महाविद्यालयाने स्पर्धेसाठी आलेल्या पंचांचे व विद्यार्थ्यांचे रहण्यापासून जेवणापर्यंत उत्तम प्रकारे व्यवस्थापन केल्याने उपस्थितांनी महाविद्यालयाचे आभार मानले व कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भेंकी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दक्षता सावंत यांनी केले तर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता प्रा. अमोल तेली यांनी केली.

You cannot copy content of this page