देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड…

⚡देवगड ता.०५-: कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय पॉवरलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत शेठ म.ग. हायस्कूल देवगड येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे.
यामध्ये १७ वर्षाखालील गटात मुलीमध्ये वेदा शशांक साटम, मुलग्यामध्ये आराध्य विशाल चौगुले आणि भावेश वाळके यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राज्यस्तरीय होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुरेश पावर , वायगणकर फिटनेस अँड अकॅडमीचे सचिव गणेश वायंगणकर , शशांक साटम यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व संस्थाचालक , तसेचे प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे , पर्यवेक्षक निशा दहिबावकर , सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page