जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडीचा समर्थ गवंडी प्रथम…

⚡मालवण ता.०५-:
मालवण येथील श्री माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी (रेडी) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर नंदिनी भिसे (सावंतवाडी) हिने द्वितीय क्रमांक व पूर्वा मेस्त्री (कणकवली) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच सायली राऊळ (पिंगुळी कुडाळ) व निधी खडपकर (सावंतवाडी) यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली.

या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २२ स्पर्धकांनी सहभागी घेतला. स्पर्धेचे परीक्षण सौ. सुप्रिया ढोके, श्री. चेतन हडकर, श्री. विकी जाधव यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व चषक तसेच उत्तेजनार्थ क्रमांकाना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page