कणकवलीत शिवसेनेच्या वतीने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी उपक्रम…

आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन उपक्रमाचे केले कौतुक_

*💫कणकवली दि.२१-:* कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने गरीब व गरजू व्यक्तींसाठी मोफत शिवभोजन थाळी उपक्रम राबविण्यात आला आहे. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी काल मंगळवार पासून दुपारी १२ ते ३ या वेळॆत गरजुंना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. सध्या जिल्ह्यात कोविडचे कडक निर्बंध असल्याने कामगार, गरीब , गरजू व्यक्तींना जेवणाची सोय व्हावी यासाठी कणकवली तालुका शिवसेनेने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर सुशांत नाईक, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, सचिन सावंत, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page