जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सावंतवाडीत पालन..

सकाळी ७ ते ११ वेळेत दुकाने ठेवली सुरु

*💫सावंतवाडी दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* जिल्हाधिकारी यांनी काल दिलेल्या आदेशानुसार सावंतवाडी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या आदेशाचे पालन करत आपली अस्थापने सकाळी ७ वाजता सुरू करून बरोबर ११ वाजता बंद करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात आपण प्रशासनासोबत कायम असल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले आहे. यावेळी शहरातील भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यासह सर्व दुकाने, बेकरी बंद करण्यात आल्या आहेत. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणारी मेडिकल स्टोअर्स फक्त सुरू ठेवण्यात आली आहेत.

You cannot copy content of this page