⚡कुडाळ ता.०२-: ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीनां कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानूसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने दि. ५ फेब्रुवारी ते दि. ७ फेब्रुवारी या कालावधीत तालुक्यात जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे व मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातुन दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, झाराप येथे अॅड.एस.एस. सावंत ‘नागरीकांची मुलभूत कर्तव्ये, एडीआर पध्दती व त्याचे फायदे’ याविषयांवर व अॅड. रुपाली कदम या ‘समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनीयता’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, तेर्सेबांबर्डे येथे अॅड.आर. .डी. बिले हे ‘महाराष्ट सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम २०१५’ याविषयावर व अॅड. संजय रानडे हे ‘बळी नुकसान भरपाई योजना’ या विषयांवर व अॅड कविता खोचरे हया ‘माहिती अधिकार कायदा २००५’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, माणगांव येथे मोबाईल लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून मिटवावीत तसेच कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) कुडाळ जी.ए. कुलकर्णी व सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) कुडाळ श्री. पी. आर. ढोरे यांनी केले आहे.
कुडाळमध्ये मोबाईल लोकअदालत आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर…
